तू नसतिस तर
तू नसतिस तर, तू नसतिस तर
तू नसतिस तर गेले असते रोप चिमुकले सुकून-वाकुन
तू नसतिस तर केले असते कुणी तयावर अमृतसिंचन?
तू नसतिस तर मिळता कोठुन घरट्याचा हा रम्य निवारा?
तू नसतिस तर मिळता कोठुन पंखाखाली गोड उबारा?
तू नसतिस तर कळली नसती कळ्या-फुलांची कोमल बोली
तू नसतिस तर मिळली नसती मृदु शीतलता चांदण्यातली
तू नसतिस तर कळले नसते जीवन म्हणजे अथांग प्रीती
तू नसतिस तर जुळल्या नसत्या गीताच्या या मंजुळ पंक्ती

गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | वहिनींच्या बांगड्या |
राग | - | दरबारी कानडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
सिंचन | - | शिंपणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.