कोटि कोटि रूपे तुझी
कोटि कोटि रूपे तुझी, कोटि सूर्य-चंद्र-तारे
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे
बीज अंकुरे ज्या ठायी तिथे तुझा वास
तुझा स्पर्श आणुन देतो फुलाला सुवास
चराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे?
कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला
जनी-निर्जनीही तुझा पाय रोवलेला
तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे?
खरे रूप देवा तुझे कोणते कळेना
तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे?
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे
बीज अंकुरे ज्या ठायी तिथे तुझा वास
तुझा स्पर्श आणुन देतो फुलाला सुवास
चराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे?
कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला
जनी-निर्जनीही तुझा पाय रोवलेला
तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे?
खरे रूप देवा तुझे कोणते कळेना
तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे?
गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | सुरेश वाडकर |
राग | - | भटियार |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
ठाय | - | स्थान, ठिकाण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.