A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू माझ्या स्वप्‍नांची कल्पना

तू माझ्या स्वप्‍नांची कल्पना
माझ्या मनाची संजीवनी तू
युगायुगांची प्रिया !

स्वर्ग सोडुनी धरती वरती
आले प्रिया मी तुझ्याचसाठी
आले सख्या मी तुझ्याचसाठी
शिल्पकला ही सजीव झाली
नितांत सुंदर किमया !

तुला बघुनी मोहून गेलो
तुला भेटण्या आतुर झालो
स्पर्श मानवी होता जाईल
बहार सारी विलया !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  उषा मंगेशकर, मन्‍ना डे