राधा ही बावरी हरीची
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी !
हिरव्याहिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंबचिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रीतीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी !
आज इथे या तरूतळी सूर वेणुचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनी प्रेम तयांचे पाही

गीत | - | अशोक पत्की |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | स्वप्नील बांदोडकर |
अल्बम | - | तू माझा किनारा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत, नयनांच्या कोंदणी |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
वेणु | - | बासरी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.