तू जपुन टाक पाऊल जरा
जीवन सुखदु:खाची जाळी
त्यांत लटकले मानव-कोळी
एकानें दुसर्यास गिळावें
हाच जगाचा न्याय खरा
हीच जगाची परंपरा !
तूं जपुन टाक पाऊल जरा
जीवनांतल्या मुशाफिरा
पापपुण्य जें करशिल जगतीं
चित्रगुप्त मागेल पावती
पापाइतुकें माप ओतुनी
जें केलें तें तसें भरा
निरोप जेव्हां येइल वरचा
तेव्हां होशिल सर्वांघरचा
तोंवर तूं या रिपु जगाचा
चुकवुनि मुख दे तोंड जरा
दानव जगतीं मानव झाला
देवाचाही दगड बनविला
कोण कोठला तूं तर पामर
चुकून तुझा करतील चुरा
त्यांत लटकले मानव-कोळी
एकानें दुसर्यास गिळावें
हाच जगाचा न्याय खरा
हीच जगाची परंपरा !
तूं जपुन टाक पाऊल जरा
जीवनांतल्या मुशाफिरा
पापपुण्य जें करशिल जगतीं
चित्रगुप्त मागेल पावती
पापाइतुकें माप ओतुनी
जें केलें तें तसें भरा
निरोप जेव्हां येइल वरचा
तेव्हां होशिल सर्वांघरचा
तोंवर तूं या रिपु जगाचा
चुकवुनि मुख दे तोंड जरा
दानव जगतीं मानव झाला
देवाचाही दगड बनविला
कोण कोठला तूं तर पामर
चुकून तुझा करतील चुरा
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | भालचंद्र पेंढारकर |
स्वर | - | भालचंद्र पेंढारकर |
नाटक | - | दुरितांचें तिमिर जावो |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
रिपु | - | शत्रु. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.