तू आहेस ना
तू आहेस ना !
(जरी हात हाती तुझा,
धुक्यासारखा स्पर्श हा
पुन्हा एकदा सांग ना,
आहेस ना?)
(नभाचा भरोसा जसा,
तसा हा दिलासा तुझा
तरी एकदा सांग ना,
आहेस ना?)
कधी शारदा तू कधी लक्षुमी तू
कधी भाविनी वा कधी रागिणी
सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे,
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर
अशी सर्वव्यापी तुझी चेतना
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना !
अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी
अम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा
तू आहेस ना !
(जरी हात हाती तुझा,
धुक्यासारखा स्पर्श हा
पुन्हा एकदा सांग ना,
आहेस ना?)
(नभाचा भरोसा जसा,
तसा हा दिलासा तुझा
तरी एकदा सांग ना,
आहेस ना?)
कधी शारदा तू कधी लक्षुमी तू
कधी भाविनी वा कधी रागिणी
सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे,
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर
अशी सर्वव्यापी तुझी चेतना
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना !
अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी
अम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा
तू आहेस ना !
गीत | - | वैभव जोशी |
संगीत | - | हृषिकेश-सौरभ-जसराज |
स्वर | - | पं. संजीव अभ्यंकर |
चित्रपट | - | आनंदी गोपाळ |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
टीप - • चित्रफितीतील स्वर- जसराज जोशी, अवधूत गुप्ते, राहुल देशपांडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत. |
भाविनी | - | कुलीन स्त्री, सुंदर स्त्री. |
ललाट | - | कपाळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.