माझ्या मातीचे गायन
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनार्यास दिवा कधी लावशील का रे
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनार्यास दिवा कधी लावशील का रे
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
चित्रपट | - | वारसा लक्ष्मीचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
श्रुति | - | कान / ऐकणे / आवाज / धर्मग्रंथ / स्वरावयव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.