अधीर याद तुझी
अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर्
अशीच वाट तुझी पाहु किती मी दिलवर्?
तमात चंद्र फुले, रात रुपेरी हसते
फुलून हासु कशी एकटीच मी दिलवर्?
ते स्वप्न आज निखार्यांत जाहले घायल्
हवा तुझाच बसंती बहार रे दिलवर्
मदिर ध्यास तुझा छेडितसे या हृदया
बहाल जन्म अता तुजवरती रे दिलवर्
अशीच वाट तुझी पाहु किती मी दिलवर्?
तमात चंद्र फुले, रात रुपेरी हसते
फुलून हासु कशी एकटीच मी दिलवर्?
ते स्वप्न आज निखार्यांत जाहले घायल्
हवा तुझाच बसंती बहार रे दिलवर्
मदिर ध्यास तुझा छेडितसे या हृदया
बहाल जन्म अता तुजवरती रे दिलवर्
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | शोभा गुर्टू |
गीत प्रकार | - | भावगीत |
तम | - | अंधकार. |
दिलवर | - | शूर / धाडसी. |
मदिर | - | धुंद करणारा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.