थेंबभर तुझे मन
थेंबभर तुझे मन.. ओघळले माझ्यावर..
माझ्यापाशी मागत होते एक पाऊस, एक सर
थेंबभर तुझे मन.. बरसले माझ्यावर..
सांगत होते कधि कधि दंवबिंदूंचे बांधु घर
थेंबभर तुझे मन.. फिदा झाले माझ्यावर..
माझ्यासाठी माळत होते अबोलीचे वळेसर
थेंबभर तुझे मन.. कोसळले माझ्यावर..
लाट जशी भरतीची एकाएकी तीरावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊस, एक सर
थेंबभर तुझे मन.. बरसले माझ्यावर..
सांगत होते कधि कधि दंवबिंदूंचे बांधु घर
थेंबभर तुझे मन.. फिदा झाले माझ्यावर..
माझ्यासाठी माळत होते अबोलीचे वळेसर
थेंबभर तुझे मन.. कोसळले माझ्यावर..
लाट जशी भरतीची एकाएकी तीरावर
गीत | - | |
संगीत | - | अवधूत गुप्ते |
स्वर | - | अवधूत गुप्ते |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत, मना तुझे मनोगत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.