A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही चाल तुरुतुरु

ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीण सळसळली !

इथं कुणी आसपास ना !
डोळ्याच्या कोनात हास ना?
तू जरा माझ्याशी बोल ना?
ओठांची मोहोर खोल ना?
तू लगबग जाता मागं वळून पाहता
वाट पावलांत अडखळली

उगाच भुवई ताणून
फुकाचा रुसवा आणून
पदर चाचपून हातानं
ओठ जरा दाबीशी दातानं
हा राग जीवघेणा खोटाखोटाच बहाणा
आता माझी मला खूण कळली