चिंता क्रोध मागे सारा
चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही
संते सुखें व्हावें पाणी
शब्दशस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्म दोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ब्रह्म जैसें तैशा परी
अम्हां वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चावली
कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही
संते सुखें व्हावें पाणी
शब्दशस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्म दोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ब्रह्म जैसें तैशा परी
अम्हां वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चावली
कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
गीत | - | संत मुक्ताई |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
उन्मनी | - | देहाची मनरहित अवस्था. |
ताटी | - | कुंपण, बांध. |
निघोट | - | परिपूर्ण / निखळ. |
वन्ही | - | अग्नी. |
पृथक्
या गीतात संत मुक्ताईंचे दोन अभंग एकत्र केले आहेत. ते असे -
या गीतात संत मुक्ताईंचे दोन अभंग एकत्र केले आहेत. ते असे -
योगी पावन मनाचा । साहे अपराध जनांचा
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा
आणि
ब्रह्म जैसें तैशा परी । अम्हां वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चावली । कोणें बत्तीशी तोडीली?
मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा
मात्र, 'चिंता क्रोध मागे सारा' ही ओळ संत मुक्ताई रचित नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.