ललना दिसे सुप्रभातीं
ललना दिसे सुप्रभातीं । नयनां तुझ्या दर्पणांतीं ।
अलकांचिया पाशा धरितां मृदू त्या हातीं ॥
हंसतमुखी ती सन्मुख राही । लाजुनि वाटे पाही ॥
अलकांचिया पाशा धरितां मृदू त्या हातीं ॥
हंसतमुखी ती सन्मुख राही । लाजुनि वाटे पाही ॥
गीत | - | ना. सी. फडके |
संगीत | - | केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने, सवाई गंधर्व |
स्वर | - | सुरेशबाबू माने |
नाटक | - | युगान्तर |
राग | - | काफी |
ताल | - | त्रिताल |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
अलक | - | कुरळे केस / कपाळावरील केसांची बट. |
कुळाच्या जन्मसिद्ध मोठेपणाचे युग संपून कर्तबगारीच्या व बुद्धिसामर्थ्याच्या मापानें मोठेपणा मोजण्याचे नवे युग उदय पावल्याखेरीज आपल्या समाजाला भाग्याचे दिवस दिसावयाचे नाहींत, ही प्रस्तुत नाटकांतील मध्यवर्ती कल्पना आहे. या कल्पनेच्या आविष्करणाला सोईचें म्हणून एका काल्पनिक संस्थानाचे वातावरण पार्श्वभूमीदाखल घेतले आहे.
(संपादित)
(संपादित)
'युगान्तर' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ग. म. वीरकर (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.