तारूं लागले बंदरीं
तारूं लागले बंदरीं ।
चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥
लुटा लुटा संतजन ।
अमुप हें रासी धन ॥२॥
जाला हरिनामाचा तारा ।
सीड लागलें फरारा ॥३॥
तुका जवळी हमाल ।
भार चालवी विठ्ठल ॥४॥
चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥
लुटा लुटा संतजन ।
अमुप हें रासी धन ॥२॥
जाला हरिनामाचा तारा ।
सीड लागलें फरारा ॥३॥
तुका जवळी हमाल ।
भार चालवी विठ्ठल ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
अमुप | - | अमाप. |
तारु | - | नौका. |
तारा | - | जहाज. |
फरारा | - | ध्वज / पताका / निशाण. |
भावार्थ-
- या चंद्रभागा नदीच्या काठावर पंढरपूर या बंदराला जहाज आले आहे.
- संत लोकहो, या जहाजावरील पारमार्थिक आणि भक्ती यांच्या धनाच्या राशी तुम्ही लुटून न्या. भरभरून न्या.
- या हरिनामाच्या जहाजाचे शीड मोठ्या डौलाने फडकत आहे.
- तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलरूपी सामानाचे ओझे वाहण्यासाठीच मी उभा आहे.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.