टप टप टप थेंब वाजती
टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक मजेत झेला धारा
पाऊस आला रे पाऊस आला
घराघरावर कौलारावर आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवीहिरवी गाणी
अवतीभवती भिजून माती सुगंध भरला सारा
काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवलेइवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा
विसरा आता पाटी-पुस्तक मजेत झेला धारा
पाऊस आला रे पाऊस आला
घराघरावर कौलारावर आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवीहिरवी गाणी
अवतीभवती भिजून माती सुगंध भरला सारा
काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवलेइवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | शमा खळे |
गीत प्रकार | - | बालगीत, ऋतू बरवा |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.