चंचल हा मनमोहन ग
चंचल हा मनमोहन ग, याला कसले बंधन ग !
हा इवलासा बाळ सावळा
हा नंदाचा कंद कोवळा
सखि याच्या खेळाला झाले थिटे नभाचे अंगण ग !
हा वार्यापरी येतो-जातो
दही-दूध-लोणी चोरून खातो
भारी अवखळ भारी अचपळ माझा हा यदुनंदन ग !
मी म्हणते हे माझे छकुले
माझ्या पोटी जन्मा आले
मुखात पण ब्रह्मांड पाहता गळते माझे 'मी'पण ग !
हा इवलासा बाळ सावळा
हा नंदाचा कंद कोवळा
सखि याच्या खेळाला झाले थिटे नभाचे अंगण ग !
हा वार्यापरी येतो-जातो
दही-दूध-लोणी चोरून खातो
भारी अवखळ भारी अचपळ माझा हा यदुनंदन ग !
मी म्हणते हे माझे छकुले
माझ्या पोटी जन्मा आले
मुखात पण ब्रह्मांड पाहता गळते माझे 'मी'पण ग !
गीत | - | अरुणा ढेरे |
संगीत | - | मिलिंद जोशी |
स्वर | - | श्रेया घोषाल |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.