तनमनाच्या मंदिरी या
तनमनाच्या मंदिरी या
जागवूया चेतना
अर्थ लाभो जीवनाला
हीच आमुची प्रार्थना
चेतना माझ्यातही
याच्यातही त्याच्यातही
पृथ्वी जल आकाश अन्
वायूतही तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा
नित्य माझी वंदना
एक आहे मागणे
हातात या सामर्थ्य येवो
भीक लाचारी दयेचा
स्पर्श ना आम्हास होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू
मंत्र जप रे तू मना
घेतले व्रत आज आम्ही
स्वप्न ते सत्यात येवो
दीन दुर्बल वंचितांचा
विसर ना आम्हास होवो
या जगी आनंद नांदो
ही मनाची कामना
जागवूया चेतना
अर्थ लाभो जीवनाला
हीच आमुची प्रार्थना
चेतना माझ्यातही
याच्यातही त्याच्यातही
पृथ्वी जल आकाश अन्
वायूतही तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा
नित्य माझी वंदना
एक आहे मागणे
हातात या सामर्थ्य येवो
भीक लाचारी दयेचा
स्पर्श ना आम्हास होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू
मंत्र जप रे तू मना
घेतले व्रत आज आम्ही
स्वप्न ते सत्यात येवो
दीन दुर्बल वंचितांचा
विसर ना आम्हास होवो
या जगी आनंद नांदो
ही मनाची कामना
गीत | - | पवन खेबूडकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | शौनक अभिषेकी |
चित्रपट | - | आम्ही असू लाडके |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रार्थना |
चेतना | - | जीवनशक्ती / अंत:प्रेरणा / स्फूर्ती / ऊर्जा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.