समाधिस्त येथें बैसले ज्ञानेश
थरारून येई रोमांच शरीरीं
झळक इथें ही अशी कांहीं न्यारी
प्रकाशा दिपवी असा हा प्रकाश
समाधिस्त येथें बैसले ज्ञानेश !
जीवनाचा अंत होऊनियां खालीं
पडे देह तैसा इथें नाही खालीं
इथें रोमरोमीं जीव मूर्तिमंत
धरूनी विसांवे चैतन्य अनंत
प्रसादास येथें मिळत प्रसाद
पडसाद ऐके मुळांतली साद
प्रतीतीस होत प्रतीत प्रतीती
आणि स्फूर्तिलागीं येत असे स्फूर्ति
एका जनार्दनीं मिळाले भांडार
ऐकुनियां आला कुणी हा पामर
नसे संत कोणी भाविक ना भक्त
असे जीव मात्र जीवनीं आसक्त
तळमळ कांहीं धरूनियां पोटीं
मिटलेल्या ओठीं रिकाम्याच ताटीं
तयावरतीहि कांहीं कृपा करा
उघडा थोडीसी ताटी ज्ञानेश्वरा !
तुमच्या स्मरणें उचंबळे मन
तुमच्या वाणीचें करीत चिंतन
तुमच्या चरणीं मस्तक ठेविलें
उचलावयाचें भान ना राहिलें !
झळक इथें ही अशी कांहीं न्यारी
प्रकाशा दिपवी असा हा प्रकाश
समाधिस्त येथें बैसले ज्ञानेश !
जीवनाचा अंत होऊनियां खालीं
पडे देह तैसा इथें नाही खालीं
इथें रोमरोमीं जीव मूर्तिमंत
धरूनी विसांवे चैतन्य अनंत
प्रसादास येथें मिळत प्रसाद
पडसाद ऐके मुळांतली साद
प्रतीतीस होत प्रतीत प्रतीती
आणि स्फूर्तिलागीं येत असे स्फूर्ति
एका जनार्दनीं मिळाले भांडार
ऐकुनियां आला कुणी हा पामर
नसे संत कोणी भाविक ना भक्त
असे जीव मात्र जीवनीं आसक्त
तळमळ कांहीं धरूनियां पोटीं
मिटलेल्या ओठीं रिकाम्याच ताटीं
तयावरतीहि कांहीं कृपा करा
उघडा थोडीसी ताटी ज्ञानेश्वरा !
तुमच्या स्मरणें उचंबळे मन
तुमच्या वाणीचें करीत चिंतन
तुमच्या चरणीं मस्तक ठेविलें
उचलावयाचें भान ना राहिलें !
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | रवींद्र साठे |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- डिसेंबर १९४५, वाशीम. |
ताटी | - | कुंपण, बांध. |
प्रतीती | - | अनुभव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.