A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तम निशेचा सरला

तम निशेचा सरला-सरला
अरुण कमल प्राचीवर फुलले
परिमळ या गगनी भरला

पावन शिवजग अवघे झाले
तव दयेचा दीप रे
अरुण कमल प्राचीवर फुलले
परिमळ या गगनी भरला
गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- रामदास कामत
अर्चना कान्हेरे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - ययाति आणि देवयानी
राग - भैरवी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
तम - अंधकार.
प्राची - पूर्वदिशा.
शिव - मंगल, कल्याणकारी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  रामदास कामत
  अर्चना कान्हेरे