का नाही हसला नुसते
का नाही हसला नुसते, मी नाही म्हटले नसते
जडलेहि कदाचित असते आपुलेच अवचित नाते
सज्जात उभी मी होते, रस्त्यात पाहिले तूते
डोळ्यांनी सांगत होते, का नाही ओळखिले ते
मश्गूल तुझे मन होते, कीर्तीला जिंकायाते
परि तुजला जिंकायाते अंतरी झुरत मी होते
मी होऊन पुसले असते, तू नाही म्हटले असते
त्या पराभवाचे पाते काळजात घुसले असते
तू वरिले दुसर्या स्त्रीते, मज दिले दुज्या पुरुषाते
दुःखात सुख परि इतुके, हे कुणास कळले नव्हते
जडलेहि कदाचित असते आपुलेच अवचित नाते
सज्जात उभी मी होते, रस्त्यात पाहिले तूते
डोळ्यांनी सांगत होते, का नाही ओळखिले ते
मश्गूल तुझे मन होते, कीर्तीला जिंकायाते
परि तुजला जिंकायाते अंतरी झुरत मी होते
मी होऊन पुसले असते, तू नाही म्हटले असते
त्या पराभवाचे पाते काळजात घुसले असते
तू वरिले दुसर्या स्त्रीते, मज दिले दुज्या पुरुषाते
दुःखात सुख परि इतुके, हे कुणास कळले नव्हते
गीत | - | बाबुराव गोखले |
संगीत | - | बाबुराव गोखले |
स्वर | - | बाबुराव गोखले |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.