तळ्यात पाही पुनव चांदवा
तळ्यात पाही पुनव चांदवा होऊन गोरामोरा
आणि सरींची सतार घेऊन नील-घन छेडी तारा
वेलीवरल्या मुक्या कळीला जाग हळू ये आज
जळवंतीच्या जळात भिजतो गंधवतीचा साज
दंवबिंदूंचे उधळीत मोती भणंग होई वारा
निवांत निजली नगरी सारी जागत बसले दिवे
हिरव्या रानी रास खेळती फूलपाखरी थवे
रात्र चांदणी चोरपाउली उजळी घन अंधारा
अशाच वेळी संयम सरतो, जडते अनाम बाधा
जडता अनाम बाधा होई लाट तळ्यांतिल राधा
भरात येता भरती, बुडतो बेहोषीत किनारा
आणि सरींची सतार घेऊन नील-घन छेडी तारा
वेलीवरल्या मुक्या कळीला जाग हळू ये आज
जळवंतीच्या जळात भिजतो गंधवतीचा साज
दंवबिंदूंचे उधळीत मोती भणंग होई वारा
निवांत निजली नगरी सारी जागत बसले दिवे
हिरव्या रानी रास खेळती फूलपाखरी थवे
रात्र चांदणी चोरपाउली उजळी घन अंधारा
अशाच वेळी संयम सरतो, जडते अनाम बाधा
जडता अनाम बाधा होई लाट तळ्यांतिल राधा
भरात येता भरती, बुडतो बेहोषीत किनारा
गीत | - | राम मोरे |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | उषा वर्तक |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.