तिने बेचैन होताना कळ्यांनी
तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देताना जिवाचे चांदणे व्हावे
किती मोजू तर्हा आता तिच्या त्या वार करण्याच्या
तिच्या हाती कट्यारीने सुखाचे खेळणे व्हावे
कधी ते डाव मांडावे, कधी हासून मोडावे
तिच्या रुसव्यात शब्दांचे दुहेरी बोलणे व्हावे
तिच्या डोळ्यांतले पक्षी फुलांचे सोबती होते
कितिदा रंग स्वप्नांचे निजेवर सांडणे व्हावे

गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | मंदार आपटे |
स्वर | - | मंदार आपटे |
अल्बम | - | तिने बेचैन होताना |
गीत प्रकार | - | भावगीत, मालिका गीत |
टीप - • मालिका- राधा ही बावरी, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.