A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तातकरीं दुहिताविनाश

तातकरीं दुहिताविनाश । बल द्याया वेगें ।
माते धांव गे ॥

अर्पुनि म्लान मुखीं । चुंबनधारा ।
घे हृदयीं फुलवीं जिवाला ।
तव माया वेगें । माते धांव गे ॥
गीत - य. ना. टिपणीस
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वराविष्कार- बालगंधर्व
पं. कुमार गंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - आशा-निराशा
ताल-कवाली
गीत प्रकार - नाट्यसंगीत, आई
  
टीप -
• गझल.
दुहिता - कन्या.
आशानिराशांच्या गळ्यांत सांपडलेलें 'आशा-निराशा' नाटक, प्रयोगरूपानें व पुस्तकरूपानें प्रकाशित होण्याचा सुयोग आज विजयादशमीला आला, ही परमेश्वरी कृपाच होय! डॉ. भडकमकर, डॉ. गोळे व डॉ. मंगेशराव परुळकर यांनी मला जिवावरच्या दुखण्यांतून वांचविलें, याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

'गंधर्व नाटक मंडळी'चे मालक श्री. बालगंधर्व यांनी अनेक अडथळे आले असता सुद्धां उत्साहपूर्वक नाटक बसवून तें नेटाने, उत्तम सजावटीने रंगभूमीवर आणले व मला हरएक प्रकारचे साहाय्य केले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

श्री. कृष्णराव (मास्टर कृष्णा) यांनी नाटकातील प्रसंगांस शोभतील अशा चाली स्वतःच्या कल्पनेने निर्माण करून दिल्या म्हणून त्यांचेहि आभार मानणे जरूर आहे .
(संपादित)

यशवंत नारायण टिपणीस
अश्विन शुद्ध १०, शिवशक २५०
'आशा-निराशा' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विश्वनाथ गोपाळ शेट्ये (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  पं. कुमार गंधर्व