A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वर्गधरेवर सुभग सोहळा

दिशादिशांनो गुलाल उधळा, उधळा मोतीचुरा
स्वर्गधरेवर सुभग सोहळा होऊ दे साजरा

कल्पतरू हा उंच वाढला, फुलाफळांनी बहरून आला
हिरवेपिवळे वैभव बघता सुखावल्या नजरा

साकारून ये सुवर्ण मंदिर, कळस झळाळे लोभस सुंदर
चक्रधारी ध्वज नभी फडफडे योगेश्वर हसरा

परदास्याची रात्र आठवे, ध्वज अंधारी लक्ष काजवे-
सूर्य होउनी जिवंत जळले, तुटल्या किती तारा

त्या अज्ञांचा [१] आठव येता, पिता हिमालय नमवी माथा
अमर कृतींना न्हाऊ घालिती गंगेच्या धारा

मनामनांतून हर्ष माईना, कळ्याफुलांतून गंध राहिना
आनंदाच्या लाटा भिजल्या तहानल्या अंबरा
गीत - मधुकर कुलकर्णी
संगीत -
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• [१] - इथे 'अज्ञातांचा' या अर्थाने.
कल्पतरू - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
सुभग - दैवी / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.