सूर जुळले शब्दही जुळले
सूर जुळले, शब्दही जुळले, जुळले मधुमय गीत
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
सात स्वरांची सुरई भरता
नयनी येई काव्य धुंदता
वाजे वीणा निघती ताना, भावही हो पुलकित
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
चमचा घेउनी ताल साधला
कसा करू पण भाव मोकळा
अबोल झाले शब्द आगळे प्रीतीसुम रंजित
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
दिसे चांदणे का चंद्राविण?
प्रीतीवाचून कुठले यौवन
काव्यासह हे कधी व्हायचे प्रीतीचे संगीत
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
सात स्वरांची सुरई भरता
नयनी येई काव्य धुंदता
वाजे वीणा निघती ताना, भावही हो पुलकित
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
चमचा घेउनी ताल साधला
कसा करू पण भाव मोकळा
अबोल झाले शब्द आगळे प्रीतीसुम रंजित
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
दिसे चांदणे का चंद्राविण?
प्रीतीवाचून कुठले यौवन
काव्यासह हे कधी व्हायचे प्रीतीचे संगीत
कधी पण जुळेल अपुली प्रीत?
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.