A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुंदरा मनामधिं भरलि

सुंदरा मनामधिं भरलि जरा नाहिं ठरलि हवेलिंत शिरलि मोत्याचा भांग
अरे गड्या हौस नाहिं पुरलि म्हणोनी विरलि पुन्हा नाहिं फिरलि कुणाची सांग
नारी ग ऽऽऽ

जशि कळी सोनचाफ्याचि न पडुं पाप्याचि दृष्टि सोप्याची नसल ती नार
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणीं चढुन सुकुमार
नारी ग ऽऽऽ

जशि मन्मथरति धाकटी सिंहसम कटी उभी एकटी गळ्यामधिं हार
अंगिं तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर मारिते लहर मदनतल्वार
पायि पैंजण झुबकेदार कुणाची दार कोण सरदार हिचा भर्तार
नारी ग ऽऽऽ

नाकामधिं बुलाख सुरति चांदणी वरति चमकती पर ती हिच्यापुढें कार
किनकाप अंगिंचा लाल हिजपुढें नको धनमाल
कविराज चमकतो हीर लोकजाहीर इतर शाहीर काजवा वांग
नारी ग ऽऽऽ

सुंदरा मनामधिं भरली.. सुंदरा ऽऽऽ