ही अशी कोषात अपुल्या
ही अशी कोषात अपुल्या हिंडणारी माणसे
पाप-पुण्यांच्या हिशेबी गुंतणारी माणसे
चेहरे आणि घरे सारेच शिसवीसारखे
दूर काचेआडुनी ही बोलणारी माणसे
शब्द यांचे पांगळे, फिरतात वारे पाहुनी
ही अशी पाहून वारे वागणारी माणसे
चेहर्यांची कात यांच्या सांडते वरचेवरी
ही दुतोंडी सर्पवंशी दंशणारी माणसे
पाप-पुण्यांच्या हिशेबी गुंतणारी माणसे
चेहरे आणि घरे सारेच शिसवीसारखे
दूर काचेआडुनी ही बोलणारी माणसे
शब्द यांचे पांगळे, फिरतात वारे पाहुनी
ही अशी पाहून वारे वागणारी माणसे
चेहर्यांची कात यांच्या सांडते वरचेवरी
ही दुतोंडी सर्पवंशी दंशणारी माणसे
गीत | - | अनिल कांबळे |
संगीत | - | अरुण काकतकर |
स्वर | - | श्रीकांत पारगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.