सुंबरान गाऊ चला
सुंबरान गाऊ चला सुंबरान गाऊ रे
या शेकोटीच्या उबीला गा रातभर राहू रे
भल्याभल्यास्नी सोसंना ही जवानीची आग
काय करामत सांगू हिची लई न्यारी धग
ऋषीमुनी बि पोळलं अशा इश्कबाजी संग
भली भली भुलली गा कथा त्येची लावू रे
विश्वामित्र बसला व्हता भगवंताच्या जपाला
डोळं मिटून ध्यान लावं रानावनात तपाला
आली मेनका नाचत, तिच्या भुलला रूपाला
तवाच्या गा येळेचा ह्यो पडताळा दाऊ रे
गौतम ऋषीची होती अहल्या बाईल
राजा इंद्रानं तिला डोळं भरून पाहिलं
पतिरूप घेऊन तिला एकान्ती त्यानं भोगलं
मोठेपणा घसरला याद त्याची ठेवू रे
असा होता पराशर मुनी, त्याला दिसली मत्स्यगंधा
साधुपणाला झाली गा तिथं कशी मदनाची बाधा
तिला भिजली बघुन तिच्या लागला की नादा
किती किती उदाहरणं सांगा अशी देऊ रे
नर-नारीची घातली अशी जल्माची गाठ
किसनदेवाच्या बायका सोळा हजार एकशे आठ
त्येंच्या शिणगाराचा छंद उभ्या दुनियेला पाठ
पुराणाचा दाखला ह्यो कलीयुगी घेऊ रे
या शेकोटीच्या उबीला गा रातभर राहू रे
भल्याभल्यास्नी सोसंना ही जवानीची आग
काय करामत सांगू हिची लई न्यारी धग
ऋषीमुनी बि पोळलं अशा इश्कबाजी संग
भली भली भुलली गा कथा त्येची लावू रे
विश्वामित्र बसला व्हता भगवंताच्या जपाला
डोळं मिटून ध्यान लावं रानावनात तपाला
आली मेनका नाचत, तिच्या भुलला रूपाला
तवाच्या गा येळेचा ह्यो पडताळा दाऊ रे
गौतम ऋषीची होती अहल्या बाईल
राजा इंद्रानं तिला डोळं भरून पाहिलं
पतिरूप घेऊन तिला एकान्ती त्यानं भोगलं
मोठेपणा घसरला याद त्याची ठेवू रे
असा होता पराशर मुनी, त्याला दिसली मत्स्यगंधा
साधुपणाला झाली गा तिथं कशी मदनाची बाधा
तिला भिजली बघुन तिच्या लागला की नादा
किती किती उदाहरणं सांगा अशी देऊ रे
नर-नारीची घातली अशी जल्माची गाठ
किसनदेवाच्या बायका सोळा हजार एकशे आठ
त्येंच्या शिणगाराचा छंद उभ्या दुनियेला पाठ
पुराणाचा दाखला ह्यो कलीयुगी घेऊ रे
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | हळदी कुंकू |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लोकगीत |
अहल्या | - | ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला. |
सुंबरान | - | धनगरी भाषेत देवाचे स्मरण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.