सुखाचे चांदणे
मोरपंखी चाहुलींचे
सोबतीने चालणे
अंतरावर पसरलेले टिपूरसे..
सुखाचे चांदणे !
कोण या वेड्या मनाला
आस लावी भाबडी
कोण आहे ज्यामुळे
हे उंबर्याला लांघणे
ही नवी सुरुवात आहे
की नवे आभास हे
दूरवरची ती निळाई मागते..
सुखाचे चांदणे !
भोवतीचे सूर हळवे
ऐकताना वाटते
गायले मी अंतरीच्या
वेदनांचे हुंदके
हरवलेली स्वप्नं होती
थबकलेली पाऊले
पण तुझ्या भेटीत आता गवसले..
सुखाचे चांदणे !
सोबतीने चालणे
अंतरावर पसरलेले टिपूरसे..
सुखाचे चांदणे !
कोण या वेड्या मनाला
आस लावी भाबडी
कोण आहे ज्यामुळे
हे उंबर्याला लांघणे
ही नवी सुरुवात आहे
की नवे आभास हे
दूरवरची ती निळाई मागते..
सुखाचे चांदणे !
भोवतीचे सूर हळवे
ऐकताना वाटते
गायले मी अंतरीच्या
वेदनांचे हुंदके
हरवलेली स्वप्नं होती
थबकलेली पाऊले
पण तुझ्या भेटीत आता गवसले..
सुखाचे चांदणे !
गीत | - | श्रीपाद अरुण जोशी |
संगीत | - | निलेश मोहरीर |
स्वर | - | विद्या करलगीकर |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • मालिका- आई कुठे काय करते !, वाहिनी- स्टार प्रवाह. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.