चल रानात सजणा
चल रानात सजणा
आंबेवनात जाऊ या दूर
राया, गुपीत अपुलं फुटलं
जग भोंतीचं बोलत सुटलं
उठे काहूर, लागे हुरहूर
आंबेवनात जाऊ या दूर
चांदण्याची पांघरुन शाल
लुटू आनंद धुंद खुशाल
बघु नवतीचा दुनियेचा नूर
आंबेवनात जाऊ या दूर
नको संकोच भीती मनात
सख्या, जीवाची करू चांदरात
दाटे प्रीतीचा रंगरस-पूर
आंबेवनात जाऊ या दूर
जीवाजिवाची मंजुळ गाणी
जीवाजिवाची प्रेमळ गाणी
बसू गात पांखरावाणी
फिरु गात पांखरावाणी
धरु प्रीतीचा एक ताल-सूर
आंबेवनात जाऊ या दूर
आंबेवनात जाऊ या दूर
राया, गुपीत अपुलं फुटलं
जग भोंतीचं बोलत सुटलं
उठे काहूर, लागे हुरहूर
आंबेवनात जाऊ या दूर
चांदण्याची पांघरुन शाल
लुटू आनंद धुंद खुशाल
बघु नवतीचा दुनियेचा नूर
आंबेवनात जाऊ या दूर
नको संकोच भीती मनात
सख्या, जीवाची करू चांदरात
दाटे प्रीतीचा रंगरस-पूर
आंबेवनात जाऊ या दूर
जीवाजिवाची मंजुळ गाणी
जीवाजिवाची प्रेमळ गाणी
बसू गात पांखरावाणी
फिरु गात पांखरावाणी
धरु प्रीतीचा एक ताल-सूर
आंबेवनात जाऊ या दूर
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
नवती | - | नवी पालवी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.