श्रम माणसाच्या हाती
असो काळी का तांबडी, अन्न उपजवी माती
वसे श्रमात श्रीमंती, श्रम माणसाच्या हाती !
धरतीच्या लेकरा रं, श्रम माणसाच्या हाती !
आधी नांगर कुळव, आण शिवार आकारा
बीज पेरल्यावाचून काय फुटतो धुमारा?
कष्टावाचून कोठली आली पिकावर शेती?
पाणी ओतते आभाळ, थेंब थेंब सांभाळावा
पाणी पाजावे पिकासी, घाम आपला गाळावा
धरितरी वाचूनिया दुजी देवता कोणती?
नको भिकेची भाकर, नको लबाडी लाचारी
नको रिती उठाठेव, नको बखेडा संसारी
दिस राबण्यात जावा, नीज आलिंगावी राती
वसे श्रमात श्रीमंती, श्रम माणसाच्या हाती !
धरतीच्या लेकरा रं, श्रम माणसाच्या हाती !
आधी नांगर कुळव, आण शिवार आकारा
बीज पेरल्यावाचून काय फुटतो धुमारा?
कष्टावाचून कोठली आली पिकावर शेती?
पाणी ओतते आभाळ, थेंब थेंब सांभाळावा
पाणी पाजावे पिकासी, घाम आपला गाळावा
धरितरी वाचूनिया दुजी देवता कोणती?
नको भिकेची भाकर, नको लबाडी लाचारी
नको रिती उठाठेव, नको बखेडा संसारी
दिस राबण्यात जावा, नीज आलिंगावी राती
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | धरतीची लेकरं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कुळव | - | औत. |
धुमारा | - | झाडाला नवी फुटलेली जोरदार फांदी. |
शिवार | - | शेत. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.