लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला
नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी
उभी जानकी जनकाजवळी
घेउनी धवल फुलांची माला
धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
काय करावे काही सुचेना
न्याहळी दुरुनी श्रीरामाला
मुनीवरांना मान देउनी
उठले रघुवीर असे पाहुनी
मनासारखे येता जुळुनी
नाचते हर्षभराने मिथिला
लाजली सीता स्वयंवराला
नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी
उभी जानकी जनकाजवळी
घेउनी धवल फुलांची माला
धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
काय करावे काही सुचेना
न्याहळी दुरुनी श्रीरामाला
मुनीवरांना मान देउनी
उठले रघुवीर असे पाहुनी
मनासारखे येता जुळुनी
नाचते हर्षभराने मिथिला
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | राम निरंजन, भावगीत |
मिथिला | - | विदेह देशाची (जनक राजाची) राजधानी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.