शोध शोधता तुला
शोध शोधता तुला, शोधता तुला
प्रिये मी हरवून बसलो मला
असेन का मी तिथे, प्रणयिनी
तुझ्याच स्मरणी अथवा नयनी
नसेल तेथे, तर मी सरलो
जन्मच गे हरवला
कितिदा वाटे स्वप्नी यावे
मुकेपणाने धुंडाळावे
उगा कुणाच्या मनी फिरण्याची
मला न ठावी कला
दोघांमधला कठिण दुरावा
दूर कसा गे कुणी करावा?
पडछायेने कसे धरावे
धुंद वाहत्या जला
प्रिये मी हरवून बसलो मला
असेन का मी तिथे, प्रणयिनी
तुझ्याच स्मरणी अथवा नयनी
नसेल तेथे, तर मी सरलो
जन्मच गे हरवला
कितिदा वाटे स्वप्नी यावे
मुकेपणाने धुंडाळावे
उगा कुणाच्या मनी फिरण्याची
मला न ठावी कला
दोघांमधला कठिण दुरावा
दूर कसा गे कुणी करावा?
पडछायेने कसे धरावे
धुंद वाहत्या जला
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | वरदक्षिणा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.