A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राया मला जरतारी शालू

दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या-परवा
अहो राया,
मला जरतारी शालू आणा, पैठणचा हिरवा

मखराभवती दोर लावा, थाटमाट करवा
मैत्रिणी माझ्या बोलवा सार्‍या, ओटी माझी भरवा
मला जरतारी शालू आणा, पैठणचा हिरवा

गावातून फिरवा मजला, पालखीत मिरवा
हळदीकुंकामध्ये माझे अंग सारे मुरवा
मला जरतारी शालू आणा, पैठणचा हिरवा