शिवरायाचे वंशज आम्ही
शिवरायाचे वंशज आम्ही
रक्त आमुचे रणवीरांचे
स्वातंत्र्यास्तव रणी झुंजतो
मरण जिंकतो आभिमानाचे
सिद्ध जाहले जवान कोटी
रक्त सांडती मातेसाठी
देशभक्तीची हीच कसोटी
शतजन्माचे भाग्य आमुचे
संगिनीस रे संगीन भिडवू
पराक्रमाचे झेंडे मिरवू
हर हर गर्जत थयथय नाचत
गीत गाऊ रे रणचंडीचे
चला पुढे रे एकजुटीने
रक्त उसळले संतापाने
दानवास रे परतुन लावा
रक्षण करण्या मानवतेचे
रक्त आमुचे रणवीरांचे
स्वातंत्र्यास्तव रणी झुंजतो
मरण जिंकतो आभिमानाचे
सिद्ध जाहले जवान कोटी
रक्त सांडती मातेसाठी
देशभक्तीची हीच कसोटी
शतजन्माचे भाग्य आमुचे
संगिनीस रे संगीन भिडवू
पराक्रमाचे झेंडे मिरवू
हर हर गर्जत थयथय नाचत
गीत गाऊ रे रणचंडीचे
चला पुढे रे एकजुटीने
रक्त उसळले संतापाने
दानवास रे परतुन लावा
रक्षण करण्या मानवतेचे
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | बाळ माटे |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
संगीन | - | व्यवस्थित / मजबूत, पक्का / बंदुकीच्या अग्रभागी लावण्याचे सुर्यासारखे शस्त्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.