शंकरा करुणाकरा
शंकरा करुणाकरा,
पाठी उभा राहुनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये, धावुनी ये
फुलवुनी अंगार डोळा
तूच मदना जाळिले
आपुल्या भक्तास भोळ्या
तूच ना सांभाळिले
आज वणवा पेटला, मेघ तू होउनी ये
आज लाखो वीर जाती
देशसेवा कारणा
तू तुझे सामर्थ्य देई
हीच माझी प्रार्थना
साधुसंतांची दयाळा, साक्ष ती घेउनी ये
पाठी उभा राहुनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये, धावुनी ये
फुलवुनी अंगार डोळा
तूच मदना जाळिले
आपुल्या भक्तास भोळ्या
तूच ना सांभाळिले
आज वणवा पेटला, मेघ तू होउनी ये
आज लाखो वीर जाती
देशसेवा कारणा
तू तुझे सामर्थ्य देई
हीच माझी प्रार्थना
साधुसंतांची दयाळा, साक्ष ती घेउनी ये
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | धन्य ते संताजी धनाजी |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.