शब्दांचा हा खेळ मांडला
शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा
अम्हां शक्ती दे शब्दशारदे गौरीतनया ईश्वरा
आम्ही जन्मभर भाट होउनी शब्दापाशी नांदतो
गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो
तुझा शब्द दे आकाशाचा, झांज डफावर स्वर गहिरा
अम्हां शक्ती दे शब्दशारदे गौरीतनया ईश्वरा
आम्ही जन्मभर भाट होउनी शब्दापाशी नांदतो
गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो
तुझा शब्द दे आकाशाचा, झांज डफावर स्वर गहिरा
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, मुकुंद फणसळकर, प्रभंजन मराठे |
चित्रपट | - | एक होता विदूषक |
गीत प्रकार | - | प्रार्थना, चित्रगीत |
भाट | - | स्तुतिपाठक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.