सावळ्या हरिचे घेई सदा
सावळ्या हरिचे घेई सदा नाम
तेणे तुझे काम पूर्ण करी
प्रह्लादाची भक्ती पाहुनी जो धावे
केशवा त्या ध्यावे मनमंदिरी
चोखोबाचा भाव मानी सदा चोखा
तोच हरि देखा घरोघरी
मानव्याचा ज्याला नित्य लागे ध्यास
हरि ही तयास हृदयी धरी
तेणे तुझे काम पूर्ण करी
प्रह्लादाची भक्ती पाहुनी जो धावे
केशवा त्या ध्यावे मनमंदिरी
चोखोबाचा भाव मानी सदा चोखा
तोच हरि देखा घरोघरी
मानव्याचा ज्याला नित्य लागे ध्यास
हरि ही तयास हृदयी धरी
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
चोखा | - | चांगला, शुद्ध. |
प्रह्लाद | - | हिरण्यकशिपू पुत्र. याच्या रक्षणार्थ विष्णूने नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूस मारिले. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.