हंसहंसुनी गालीं कितिकदां
हंसहंसुनी गालीं कितिकदां । लावियलें वेड तूं ।
गुणगुणुनी कानीं कितिकदां । लावियली ओढ तूं ॥
रुसरुसुनी उगिच कितिकदां । वाढविलें प्रेम तूं ।
मज खचित बाई कळत ना । रीत तुझ्या प्रीतीची ॥
गुणगुणुनी कानीं कितिकदां । लावियली ओढ तूं ॥
रुसरुसुनी उगिच कितिकदां । वाढविलें प्रेम तूं ।
मज खचित बाई कळत ना । रीत तुझ्या प्रीतीची ॥
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | डी. पी. कोरगावकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | आशीर्वाद |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.