सौंदर्याची खाण पाहिली
सौंदर्याची खाण पाहिली आम्ही पहिल्यांदा
नयनांमधला बाण लागला आम्हा पहिल्यांदा
वाटते, परंतु सांगाया ना जुळे
डोळ्यांत आमुच्या भाव नवे आगळे
बोलल्यावाचुनी गुज तुम्हाला कळे
शब्द मधाचे ठिबकू द्यातना कानी पहिल्यांदा
हा रंग गोरटा, गालावरची खळी
पाहता आमुच्या पावन झाल्या कुळी
उपजली उगीचच मनात आशा खुळी
घायाळाची गती समजली आम्हा पहिल्यांदा
या आधी आम्हा माहीत नव्हती प्रीती
परि आज सुखाचा स्वर्ग लागला हाती
कधी दोन मनांची जुळून येतील नाती
नकळत चेटुक होय आम्हावर असले पहिल्यांदा
नयनांमधला बाण लागला आम्हा पहिल्यांदा
वाटते, परंतु सांगाया ना जुळे
डोळ्यांत आमुच्या भाव नवे आगळे
बोलल्यावाचुनी गुज तुम्हाला कळे
शब्द मधाचे ठिबकू द्यातना कानी पहिल्यांदा
हा रंग गोरटा, गालावरची खळी
पाहता आमुच्या पावन झाल्या कुळी
उपजली उगीचच मनात आशा खुळी
घायाळाची गती समजली आम्हा पहिल्यांदा
या आधी आम्हा माहीत नव्हती प्रीती
परि आज सुखाचा स्वर्ग लागला हाती
कधी दोन मनांची जुळून येतील नाती
नकळत चेटुक होय आम्हावर असले पहिल्यांदा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | करावं तसं भरावं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.