जो काल इथे आला तो
जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता
ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते
ती जुनीच होती सलगी पण स्पर्श कोवळा होता
वेचली फुले थेंबांची, ओठही फुलांचे होते
डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता
पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता
ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते
ती जुनीच होती सलगी पण स्पर्श कोवळा होता
वेचली फुले थेंबांची, ओठही फुलांचे होते
डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता
पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता
गीत | - | संगीता जोशी |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | श्रीधर फडके |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.