सांगू कसे तुला मी
सांगू कसे तुला मी? माझ्या मनातले ग !
नाते मला कळाले माझ्यातुझ्यातले ग !
कानात सांग माझ्या हलकेच नाव आता
केव्हाच पाखरांचे आवाज थांबले ग !
डोळ्यांत लाजणार्या लपवून घे मला तू
दारात चांदण्याचे पाऊल वाजले ग !
ये ना मिठीत माझ्या, का लाजतेस आता?
देहात अमृताचे आभाळ सांडले ग !
नाते मला कळाले माझ्यातुझ्यातले ग !
कानात सांग माझ्या हलकेच नाव आता
केव्हाच पाखरांचे आवाज थांबले ग !
डोळ्यांत लाजणार्या लपवून घे मला तू
दारात चांदण्याचे पाऊल वाजले ग !
ये ना मिठीत माझ्या, का लाजतेस आता?
देहात अमृताचे आभाळ सांडले ग !
गीत | - | अनिल कांबळे |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | रवींद्र साठे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.