A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चंद्रा

थांबला का उंबर्‍याशी, या बसा राजी खुशी
घ्या सबुरीनं विडा, का उगा घाई अशी?

विझला कशानं सख्या सजणा सांगा लुकलुकणारा दिवा
वणवा जिव्हारी धुमसंल्‌ राया जी रातभर आता नवा

नार नटखट नटखट अवखळ तोर्‍याची, तरणीताठी नखर्‍याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजुक छम्‌छम्‌ घुंगराची

बाण नजरंतला घेउनी,
अवतरली सुंदरा.. चंद्रा !
रातरंगी रती रंगुनी.. चंद्रा !
साज शिणगार हा लेउनी.. चंद्रा !
सूरतालात मी दंगुनी,
आले तारांगणी.. चंद्रा !

सरते ही बहरते रात झुरते चांदण्याची
जीव जाळी येत नाही चांद हाताला
लहरी याद गहिरी, साद जहरी काळजाची
घ्या दमानं ह्या उधाणाच्या इशार्‍याला
अवघड थोडं राया, नजरेचं कोडं राया
सोडवा धीरानं साजना..

नार नटखट नटखट अवखळ तोर्‍याची, तरणीताठी नखर्‍याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजुक छम्‌छम्‌ घुंगराची

बाण नजरंतला घेउनी,
अवतरली सुंदरा.. चंद्रा !
रातरंगी रती रंगुनी.. चंद्रा !
साज शिणगार हा लेउनी.. चंद्रा !
सूरतालात मी दंगुनी,
आले तारांगणी.. चंद्रा !
गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर- श्रेया घोषाल
चित्रपट - चंद्रमुखी
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.