A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मीच मला पाहते आजच का

मीच मला पाहते, पाहते आजच का?

असा मुलायम असा
देह तरी हा कसा?
माझा म्हणू तरी कसा?
हा डोह जणू की कृष्ण सावळा, मी त्याची राधिका !

काठावरले तरू
हळूच पाहते धरू
मोरपिशी पाखरू
मज आज गवसली माझ्या मधली सोन्याची द्वारका !

पदर असा फडफडे
नजर फिरे चहूंकडे
नवल देखणे घडे
हा तरंग मागेपुढे जळावर हलतो का सारखा?