सनई वाजे मंजूळ नादे
सनई वाजे, मंजूळ नादे, चौघड झडला समयाला
दोन मनांचे होते मीलन लग्न म्हणती या विधीला
वात्सल्याची ममता वेडी, जीव जगवितो जिवाला
शुभ मुहूर्तावर शुभमंगल हे वासरू तोडिती गाईला
धन्य आपुली माता-पिता हो जयांनी अपणां जन्म दिला
सार्थक व्हावे, असेची करावे मिळवू आपण कीर्तिला
तुम्हांसाठी सर्वच झटतील सर्वांसाठी तुम्ही झटला
एकदिलाने नांदेल अपुल्या सुख-समृद्धी देशाला

गीत | - | शाहीर पुंडलिक फरांदे |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | शाहीर पुंडलीक फरांदे |
गीत प्रकार | - | लोकगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.