संपले स्वप्न ते
संपले स्वप्न ते शोधिसी का पुन्हा
ऐक वेड्या मना..
एक चैत्रात चाहूल आली
वेल भोळी खुलून धुंद झाली
गंध आला वना, जाग ये यौवना
रोमरोमांतुनी गोड संवेदना
लोपल्या त्या खुणा..
आज वसंत शोभा नाही
उष्ण वारे उसासून वाही
भाजणारी हवा, शोष लागे जीवा
चैत्र गेला, क्षणाचा जणू पाहुणा
माळ सारा सुना..
वारी भासात मोहून जावे
एक ध्यासात वेड्या फिरावे
दूर होती कशा, ओळखिच्या दिशा
शून्यता अंतरी, अंधता लोचना
क्रूर ही वंचना..
ऐक वेड्या मना..
एक चैत्रात चाहूल आली
वेल भोळी खुलून धुंद झाली
गंध आला वना, जाग ये यौवना
रोमरोमांतुनी गोड संवेदना
लोपल्या त्या खुणा..
आज वसंत शोभा नाही
उष्ण वारे उसासून वाही
भाजणारी हवा, शोष लागे जीवा
चैत्र गेला, क्षणाचा जणू पाहुणा
माळ सारा सुना..
वारी भासात मोहून जावे
एक ध्यासात वेड्या फिरावे
दूर होती कशा, ओळखिच्या दिशा
शून्यता अंतरी, अंधता लोचना
क्रूर ही वंचना..
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | श्रीधर-उदय |
स्वर | - | राणी वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
वंचना | - | फसवणूक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.