सांभाळ दौलत सांभाळ
आम्ही जातोय शेतावरी, मागतो बैत्याची भाकरी
बैत्याची भाकरी अन् करतो अंबेची चाकरी
कर सेवा अशी लोकांची, सांभाळ ठेव लाखाची, आशीर्वाद माझा !
येड्या मानसा जपून चाल, देव जागतो सांजसकाळ
सांभाळ दौलत सांभाळ, अरं ही दौलत सांभाळ
ह्यो यज्ञ मांडला कर्मासंगती धर्माचा
ह्यो वारा गातोय मंतर हरीच्या नामाचा
कुणी राकुस येता बाण सुटावा रामाचा
पाप मरावं पुण्य उरावं, दुनिया र्हाईल खुशाल
ह्ये माणिकमोती तालावरती डुलत्यात
ह्ये रान पाचूचं बघून डोळं दिपत्यात
ही आतुर झाली पिकं, जाऊ द्या पोटात, भुकेल्या पोटात
त्यागावरती सारी जगती, अन्नब्रह्माची कमाल
पाणी सुटंल तोंडाला, भूमी होईल अनावर
ही बाग देवाची तुडवा करतील जनावरं
जीव जगण्यापायी जल्म घेतो जगावर
माया द्यावी ममता घ्यावी, सुखाचा होईल सुकाळ

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | अपर्णा मयेकर, शरद जांभेकर |
चित्रपट | - | पाच नाजूक बोटे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
बैते | - | गावच्या वतनदारांना शेतावर त्यांच्या हक्काबद्दल द्यावयाचे धान्य. गावचे वतनदार बारा असत- कोळी, कुंभार, गुरव, चांभार, न्हावी, परीट, भट, महार, मुलाणा, मांग, लोहार, सुतार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.