समज मानिनी
समज मानिनी, मान न करिं गे.
झलक चपळ ही व्ययार्थ,
हीस्तव प्रणयाचा अपमान न करिं गे.
अमृतमधुर रसपान हवें
तरी अधररसाचें दानच करिं गे.
मधुमय कोमल कमल कमलमुखि,
मधुदानीं अनमान न करिं गे.
चंद्रमुखी, हा चंद्र कांतिमय
कांतिदानिं अभिमान न करिं गे.
झलक चपळ ही व्ययार्थ,
हीस्तव प्रणयाचा अपमान न करिं गे.
अमृतमधुर रसपान हवें
तरी अधररसाचें दानच करिं गे.
मधुमय कोमल कमल कमलमुखि,
मधुदानीं अनमान न करिं गे.
चंद्रमुखी, हा चंद्र कांतिमय
कांतिदानिं अभिमान न करिं गे.
गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | पं. कुमार गंधर्व |
स्वर | - | पं. कुमार गंधर्व |
राग | - | भूप |
गीत प्रकार | - | कविता |
टीप - • काव्य रचना- जानेवारी १९२३, अजमेर. • 'तांबे गीत रजनी' या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.