A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सख्यासाठी झुरते ग

सख्यासाठी झुरते ग बाई
रायासाठी झुरते मी बाई

कुठंकुठं पाहू प्राणप्रियाला
जाऊन सांगा कुणी ग तयाला
काय करू मी तरुण देहाला
काळजी अंतरी करते ग बाई

सदोदित संगतित पती ग असावा
मजपासून कधीचा दूर तो नसावा
पहावा प्रीतिने प्राणविसावा
म्हणून पाय धरते ग बाई