A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखये अनसूये थांब

सखये अनसूये थांब कि बाई ।
येतें मी, अशि कां घाई ॥

रुतला दर्भांकुर माझ्या पाईं ।
मजला तो दुःखद होई ॥

साडी कोराटिस गुंतून जाई ।
सोडवितें तोंवरिं राही ॥