तुला लागले गीत माझे
स्वरांची थांबली दिंडी, तुझ्या दारी तुझ्यासाठी
कधी पासून शब्दांची सुरू वारी तुझ्यासाठी
तुला लागले गीत माझे कळाया
तुझ्या अंतरी लागलो मी जळाया
कशाला तुझा हात हातात आला
पुन्हा लागला तोल माझा ढळाया
तुझ्या अंगणी गंध येईल माझा
तुला वाचुनी लागलो दरवळाया
आता संपले स्वप्न हे तारकांचे
निघाला गडे चंद्रही मावळाया
कधी पासून शब्दांची सुरू वारी तुझ्यासाठी
तुला लागले गीत माझे कळाया
तुझ्या अंतरी लागलो मी जळाया
कशाला तुझा हात हातात आला
पुन्हा लागला तोल माझा ढळाया
तुझ्या अंगणी गंध येईल माझा
तुला वाचुनी लागलो दरवळाया
आता संपले स्वप्न हे तारकांचे
निघाला गडे चंद्रही मावळाया
गीत | - | अरुण सांगोळे |
संगीत | - | भीमराव पांचाळे |
स्वर | - | भीमराव पांचाळे |
गीत प्रकार | - | कविता |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.